Photos | रिप्सी भाटिया आणि शरद मल्होत्राने लॉकडाऊनमध्ये साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस
सर्व फोटो अभिनेता शरद मल्होत्रा आणि त्याची पत्नी रिप्सी भाटिया या दोघांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आले आहेत.
सेलिब्रेशनच्या फोटोंसोबतच रिप्सीने वर्षभराआधी झालेल्या आपल्या लग्नाचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.
दरम्यान, हे जोडपं ग्रँड पार्टी होस्ट करू शकलं नाही. परंतु, त्यांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी लॉकडाऊनमध्येही आपला लग्नाचा वाढदिवस, हटके स्टाइलने सेलिब्रेट केल्याचं पाहायला मिळत आहे.
यादरम्यान क्वॉलिटी टाइम स्पेंड करतानाचे दोघांचे फोटो फॅन्सना प्रचंड आवडत आहेत.
रिप्सी भाटियाने आपल्या वाढदिवसासाठी स्पेशल चॉकलेट केक तयार केला होता.
कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान दोघांनी आपला लग्नाचा पहिला वाढदिवस हटके अंदाजात साजरा केला.
लोकप्रिय टिव्ही अभिनेता शरद मल्होत्रा आणि त्याची पत्नी रिप्सी भाटियाने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. यादरम्यानचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.