PHOTO : नरेंद्र मोदींच्या आवाहनाला बॉलिवुडकरांचा प्रतिसाद
बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियोनही मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसून आली. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुनील ग्रोवरनेही दिवा लावून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
साऊथ सुपरस्टार रजनीकांत आपल्या पत्नीसह मेणबत्ती घेऊन दिसून आले.
कतरीना कैफही यावेळी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसून आली.
जान्हवी कपूरही यावेळी मेणबत्ती हातात घेऊन दिसून आली.
कार्तिक आर्यननेही मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यादरम्यानचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
बिग बी आपल्या घरात मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसून आले. त्यांनी फोटो शेअर केला आहे.
शाहरूख खानचा लहान मुलगा अबराम खानही यादरम्यान मेणबत्ती हातात धरून उभा राहिला.
अक्षय कुमारने घराच्या बाल्कीनीमध्ये उभं राहून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सांगितलं आहे की, 'आपण एकत्र उभे आहोत आणि आपण या अंधारातून नक्कीच बाहेर येऊ, तोपर्यंत सुरक्षित राहा.'
रणवीर-दीपिकानेही एकत्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यादरम्यानचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अनुष्का आणि विराट दीपप्रज्वलन करताना दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला बॉलिवूड स्टार्सनीदेखील प्रतिसाद दिला आहे. सर्व सेलिब्रिटींनी आपल्या घरातील वीज बंद करून बाल्कनी आणि दरवाजांमध्ये दिवे लावले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -