PHOTO : आसावरीच्या सुनेची पहिली मकरसंक्रात होणार साजरी; हलव्याच्या दागिन्यांमध्ये शुभ्रा दिसतेय गोजिरी
वेगळा विषय अत्यंत उत्तम पद्धतीने मांडल्यामुळे कमी वेळातच ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
सध्या मकरसंक्रातीचा सण येत आहे. अशातच शुभ्राची ही पहिली मकरसंक्रात असणार आहे. त्यामुळे शुभ्राची सासू आसावरी तिचे सगळे लाड पुरवणार आहे.
आपली पहिली मकरसंक्रात शुभ्रा उत्साहात साजरी करणार आहे.
मकरसंक्रातीच्या खास भागासाठी शुभ्राने हलव्याचे दागिने परिधान केले आहेत.
आपली मतं रोखठोकपणे मांडणारी शुभ्रा प्रेक्षकांना आपल्या घरातीलच वाटू लागली आहे.
'होणार सून मी या घरची' मालिकेतील जान्हवी प्रमाणेच तेजश्रीने साकारलेली 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील शुभ्रानेही प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली.
पाहता पाहता आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांनी चक्क डोक्यावर उचलून घेतली.
'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या जान्हवीने म्हणजेच, तेजश्री प्रधानने 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं.