काळ्या समुद्रात सापडले रशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष!
एबीपी माझा वेब टीम | 27 Dec 2016 11:06 AM (IST)
1
ब्लॅक बॉक्स सापडेपर्यंत शोधमोहीम सुरु राहिल, अशी माहिती रशियन तपास अधिकाऱ्यांनी दिली.
2
काळ्या समुद्रात किनाऱ्यापासून जवळपास दीड किलमोटीर दूर आणि 27 मीटर समुद्रात खोल विमानाचे अवशेष सापडले.
3
तपास अधिकाऱ्यांनी विमान दुर्घटनेचं कारण सांगितलेलं नाही. मात्र, या दुर्घटनेशी कोणताही दहशतवादी कारवायांचा संबंध नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स अद्यापही समुद्रात असल्याने ठोस कारण कळू शकलेलं नाही.
4
रशियाहून सीरियाला जात असलेल्या 'टू-154' या लष्करी विमानाने सोमवारी सोची शहरातून उड्डण घेतलं आणि काही वेळातच दुर्घटना घडली.
5
रशियाच्या दुर्घटनाग्रस्त लष्करी विमानाचे अवशेष काळ्या समुद्रात सापडले आहेत. सीरियाच्या दिशेने जाणारं विमान काळ्या समुद्रात कोसळलं होतं. या विमानातील 92 प्रवाशांचा मृत्यू झाला.