पिंपरीत बॉम्बे सॅपर्सच्या चित्तथरारक कसरती!
एकूणच हे सगळं दृश्य काळजाचा ठोका चुकवणार होतं, पण आनंद देणारंही असल्याने ते बघण्यासाठी शेकडो नागरिक आणि बच्चे कंपनीने इथे गर्दी केली होती.
भारतीय लष्करातील जवान अद्वितीय साहसासाठी ओळखले जातात. बॉम्बे सॅपर्सचे जवान ही त्यापैकीच एक. पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरात या रेजिमेंटच्या जवानांनी हवेतील चित्तथरारक कसरती करत, अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
पाहा आणखी फोटो...
जवानांनी सुमारे आठ हजार फूट उंचीवरुन पॅराग्लायडिंग करत अशा वेगवेगळ्या प्रकारे लँडिंग केलं. युद्धभूमीवर असताना या जवानांच्या पाठीवर अनेक दिवसांचं खाद्यपदार्थ, स्फोटक आणि बंदुका घेऊन त्यांना विमानातून अशाच पद्धतीने पॅराशूटच्या सहाय्याने उतरवलं जातं. त्याचीच ही प्रात्यक्षिक आहेत.
पाहा आणखी फोटो...
बॉम्बे सॅपर्सच्या रि-युनियन सोहळ्याचं निमित्त होतं. दर चार वर्षांनंतर या रेजिमेंटचे सर्व जवान आणि अधिकारी एकत्रित येतात. त्यावेळी अनेक प्रकारच्या कसरती करुन त्यामध्ये अव्वल येणाऱ्या जवानांच्या इथे सन्मान केला जातो.
आपल्या पाठीवर तिरंग्याचे बलून्स घेऊन जवान कसरती करत होते.