माऊलीच्या पालखीच्या मानाच्या अश्वांचे पंढरीकडे प्रस्थान
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअश्वानी प्रस्थान केले त्यावेळी वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे ,,वारकरी आणि संयोजक अतुल नाझरे ,ग्राम पंचायत सदस्य अमर शितोळे ,सुनील शितोळे ,पै . सुनील विधाते यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते . अंकलीकर सरकारांकडे वारीतील न्याय व्यवस्था ,अश्वांची व्यवस्था अशा अनेक जबाबदाऱ्या वंशपरंपरागत त्यांच्याकडे आल्या आहेत .
गेल्या १८५ वर्षांपासून अंकलीच्या शितोळे सरकारांच्या कडून . संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यातील मानाचे दोन अश्व पाठवले जातात . दि . २७ रोजी हे अश्व गावोगावी मुक्काम करत आळंदीला पोचणार आहेत . तेथून पुढे पालखीसमावेत हे अश्व पंढरीकडे प्रस्थान करणार आहेत . वाटेत अनेक ठिकाणी होणाऱ्या रिंगणात हे अश्वच सहभागी होणार आहेत . मानाच्या या अश्वांचा वारी व्यतिरिक्त मुक्काम अंकली येथे शितोळेकर सरकार यांच्या वाड्यात असतो . रिंगणात धावण्यासाठी या अश्वांना कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही . अश्वांना केवळ बुक्का लावून त्यांना सोडले की माऊलींचे अश्व रिंगण पूर्ण करतात . अग्रभागी असलेल्या अश्वावर चामर असते आणि दुसऱ्या अश्वावर जरीपटका घेतलेला घोडेस्वार असतो .
बेळगाव जिह्यातील अंकली गावातील अंकलीकर वाड्यात अश्वांचे पूजन श्रीमंत सरदार उर्जितसिंहराजे शितोळे सरकार आणि श्रीमंत सरदार कुमार महादजीराजे शितोळे सरकार यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले . नंतर अंकली गावातून मानाच्या अश्वांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली . मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविक पाणी घालून अश्वांचे पूजन , नमस्कार करून खाद्य देत होते . अंकली नगर प्रदक्षिणा संपल्यावर मानाच्या अश्वानी म्हैसाळकडे प्रस्थान केले .
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या दोन अश्वानी अंकलीहून शुक्रवारी आळंदीकडे प्रस्थान केले. अंकलीच्या शितोळे सरकारांकडे वारीचे अनेक मान आहेत त्यापैकी एक म्हणजे दरवर्षी माऊलीच्या पालखीचे अश्व शितोळे सरकार देतात. अग्रभागी वारकरी मंडळी हरिनामाचा गजर करत होती. चामर असलेला अश्व आणि त्यामागे जरीपटका असलेल्या अश्वावर घोडेस्वार होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -