पालघर भूकंप : एनडीआरएफची पथकं मदतीसाठी दाखल
तलासरी आणि डहाणू तालुके गेल्या तीन महिन्यापासून भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भीतीने नागरिकांना रात्री-अपरात्री घराबाहेर अंगणात उघड्यावर झोपावे लागत आहे. आतापर्यंत 14 पेक्षा जास्त वेळा भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआहे. या पार्श्वभूमिवर पिंपरी चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफची दोन पथकं पालघरमध्ये पोहोचली आहेत.
पालघर जिल्ह्यात काल दिवसभरात एकामागोमाग एक भूकंपाच्या 6 धक्क्यांनी हादरलं आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. हे धक्के 4.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे असल्यानं पालघरवासियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना भूकंपानंतरच्या परिस्थितीला कसं सामोरं जावं याचं प्रात्यक्षिक एनडीआरएफकडून देण्यात येणार आहे. एनडीआरएफने सोबत 200 टेंट आणि आपत्ती व्यवस्थापनाची सर्व साधनं आणली आहेत.
भूकंपाच्या धक्क्यांनंतर बरेचशी कुटुंबं भीतीच्या सावटाखाली आहेत. ती घरात राहायला तयार नाहीत. त्या कुटुंबांना टेंटमध्ये राहण्याची सोय एनडीआरएफकडून केली जात आहे.
पालघर जिल्ह्यात भूकंपाचं सत्र सुरुच आहे. काल दिवसभरात भूकंपाच्या 5 धक्क्यांनी पालघर जिल्हा हादरला आहे.
भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या या चिमुरडीचा मृत्यू झाला
वेदांत मेडिकल कॉलेज भागात देखील मोठे धक्के जाणवल्याने कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णांसह नातेवाईकही हॉस्पिटल बाहेर पडले होते.
वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
कच्च्या बांधकामाची घर असलेल्यांना रात्री घराबाहेरच झोपण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. भुंकपाच्या धक्क्यांमुळे लोकांच्या घरांची पडझड होत असून शाळांच्या भिंतींना तडे पडले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -