पाकिस्तानी स्टेज डान्सरची गोळ्या झाडून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 25 Nov 2016 10:28 PM (IST)
1
स्टेज डान्ससाठी किस्मत बेग पाकिस्तानमध्ये बरीच प्रसिद्ध होती.
2
दरम्यान, याआधीही तिच्यावर दोनदा हल्ला करण्यात आला होता.
3
या हल्ल्यात ड्रायव्हरही गंभीर जखमी झाला आहे.
4
जिओ न्यूजनुसार, किस्मत बेगच्या ड्रायव्हरचं म्हणणं आहे की, तीन हल्लेखोरांनी हल्ला केला. आधी रॉडनं काचा फोडल्या आणि नंतर तिच्यावर गोळ्या झाडल्या.
5
या हल्ल्यात किस्मत बेग गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोवर तिनं प्राण सोडला होता.
6
पाकिस्तानमधील लाहोर येथे स्टेज डान्सर किस्मत बेग आणि तिच्या सुरक्षा रक्षकाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली आहे. आपल्या कारमधून जात असताना तिच्यावर हा गोळीबार करण्यात आला. दरम्यान, याआधी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलूच हिची तिच्या भावाने गोळ्या झाडून हत्या केली होती.