सख्ख्या भावानेच कंदील बलोचचा गळा घोटला!
कंदील सोशल मीडियावर अनेक उत्तेजक सेल्फीमुळे वारंवार चर्चेत येत होती. सोशल मीडियावर तिचे बरेच चाहतेही होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमॉडेलिंग सुरु केल्यानंतर तिनं आपलं नाव बदलून कंदिल बलौच असं ठेवलं.
कंदीलचं खरं नाव फौजिया अजीम होतं.
‘डॉन’चा वृत्तानुसार, कंदीलनं पोलीस सुरक्षा हवी यासाठी अर्जही केला होता.
पोलिसांच्या मते, ‘कंदीलला तिच्या कुटुंबीयांकडून मॉडेलिंग सोडण्यासाठी धमकी देण्यात येत होती. तिचा भाऊ देखील तिला फेसबुक पोस्ट आणि व्हिडिओवरुन वारंवार धमकी देत होता.
14 जुलैला वसीमही तिला भेटण्यासाठी आला होता.
दिलच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कंदिल ईदच्या सुट्टीसाठी कराचीहून मुलतानला आली होती.
कंदीलच्या वडिलांनी दावा केला होता की, तिचा छोटा भाऊ वसीमनंच तिची केली आहे.
मागील महिन्यात कंदीलनं मौलवी मुफ्ती अब्दुल कावी सोबत सेल्फी घेतला होता. त्यावरुन पाकमध्ये बराच वाद निर्माण झाला होता. यानंतर रएत-ए-हिलालने मुफ्ती कावीचं निलंबन केलं होतं.
‘द डॉन’च्या वृत्तानुसार, वसीम म्हणतो की, ‘कंदीलची हत्या केली कारण की, सोशल मीडियावर आपत्तीजनक व्हिडिओ आणि वक्तव्य प्रसिद्ध करुन तिनं बलौच कुटुंबाचं नाव धुळीला मिळावलं होतं.
कंदीलचा छोटा भाऊ वसीमला काल रात्री डेरा गाजी खान इथून अटक करण्यात आली. त्यानंतर वसीमने मान्य केलं की, बहिणीला अंमली द्रव्य देऊन नंतर तिची गळा आवळून हत्या केली.
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचच्या हत्येच्या आरोपाखाली तिच्या लहान भावाला अटक करण्यात आली आहे. कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्यानं भावानं कंदीलची हत्या केली असल्याचं समजतं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -