पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमविरोधात अटक वॉरंट जारी
दरम्यान, याप्रकरणी मेजर रेहमानला जामीन मंजूर झाला होता. तसेच त्यानं अक्रमला पत्र लिहून झाल्या प्रकरणाची माफीही मागितली होती.
अपघात झाल्यानंतर दुसऱ्या कारमधील व्यक्तीनं मागील सीटवरुन उतरुन थेट अक्रमच्या कारवर गोळीबार केला होता.
अक्रमच्या कारनं दुसऱ्या कारला धडक दिली होती. त्यानंतर त्याच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता.
ऑगस्ट 2016मध्ये अक्रम गोलंदाजांना प्रशिक्षण देण्यासाठी कराची नॅशनल स्टेडिअममध्ये जात असताना त्याच्या मर्सिडिज कारची एका दुसऱ्या कारला धडक बसली होती.
या प्रकरणातील खास गोष्ट म्हणजे स्वत: अक्रमनं मागील वर्षी ऑगस्टमध्ये कोर्टात याचिका दाखल केली होती. अक्रमनं बहादूरबाद पोलीस ठाण्यातील सेवानिवृत्त मेजर अमीरुर रेहमान आणि अन्य लोकांविरोधात याचिका दाखल केली होती.
कराचीमधील एका स्थानिक कोर्टानं मंगळवारी पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. मागीव 31 सुनावणीस गैरहजर राहिल्यानं हे वॉरंट बजावण्यात आलं आहे.
पाकिस्तानच्या एका दिग्गज गोलंदाजविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.