एका ट्वीटमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ!
महत्त्वाचं म्हणजे राहिल शरीफ यांच्या निवृत्तीवर पाकिस्तानी मीडियाही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. मीडियाने राहिल शरीफ यांच्या निवृत्तीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
पाकिस्तानच्या ISPR चे डायरेक्टर जनरल असीम बाजवा यांच्या ट्वीटनंतर पाकिस्तानी मीडियामध्ये राहिल शरीफ यांच्या निरोपाची चर्चा सुरु झाली.
खरंतर लष्करप्रमुखाचा कार्यकाळ संपण ही मोठी गोष्ट नाही. पण पाकिस्तानच्या इतिहासावर नजर टाकली तर असं दिसेल की, पाकिस्तानात अनेक लष्करप्रमुखांनी सत्ता उलथवून लष्कराचं शासन प्रस्थापित केलं आहे. अशा परिस्थितीत राहिल शरीफ यांनी मात्र शांततेने त्यांचा कार्यकाळ संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
लष्करप्रमुख राहिल शरीफ यांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत लावले जाणारे अंदाज पाकिस्तानी लष्कराच्या पब्लिक रिलेशन डिपार्टमेंटने ट्वीटच्या माध्यमातून फेटाळले आहेत.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. पण पाकिस्तानी सैन्याच्या पब्लिक रिलेशन डिपार्टमेंटच्या एका ट्वीटमुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. या ट्विटनंतर पाकिस्तानच्या मीडियामध्ये चर्चा सुरु झाली आहे.