Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भिम अॅपचे गुगल प्ले स्टोअरवर 40 फेक व्हर्जन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात लाँच केलेल्या भिम अॅपचे गुगल प्ले स्टोअरवर तब्बल 40 फेक व्हर्जन उपलब्ध झाले आहेत. युझर्सनी अॅप डाऊनलोड करताना अॅप तयार करणाऱ्या कंपनीचं नावही पाहणं गरजेचं आहे. हे अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे (NPCI) ने तयार केलं आहे. इतर अॅपच्या मेकर कंपनी वेगवेगळ्या असून ही बनावट अॅप आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअॅपच्या पर्यायावर क्लिक केल्यानतंर अॅप तयार करणाऱ्या कंपनीचं नावही प्ले स्टोअरमध्ये पाहता येईल. हे अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे (NPCI) ने तयार केलं आहे. त्यामुळे एनपीसीआयने तयार केलेलंच अॅप डाऊनलोड करावं.
प्ले स्टोअरला BHIM सर्च केल्यानंतर खरं अॅप टॉपला दिसेल. शिवाय या अॅपच्या लोगोचा रंगही फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे. आणखी एक म्हणजे हे अॅप प्ले स्टोअरशिवाय इतर कुठेही उपलब्ध नाही.
युझर्सकडून चुकीने हे फेक अॅप डाऊनलोड केले जात आहेत. काही युझर्सने या अॅपचा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठीही केल्याचं प्ले स्टोअरवर अॅपखालील कमेंट पाहून लक्षात येतं. भिमच्या फेक अॅपच्या तक्रारीही केल्या जात आहेत.
गुगल प्ले स्टोअरवर BHIM अॅप सर्च केल्यानंतर खरं अॅप सर्वात टॉपला म्हणजे वर दिसेल. मात्र त्याखाली *99#BHIM UPI, modi BHIM, BHIM payment असे फेक अॅप दिसतात. त्यामुळे युझर्सना खरं अॅप शोधणं अवघड जातं.
हे अॅप सध्या केवळ अँड्रॉईड स्मार्टफोनसाठीच उपलब्ध असून लवकरच आयफोनसाठी देखील उपलब्ध होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -