✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ओरिएन्टल डॉर्फ किंगफिशरबद्दल तुम्हाला काय माहित आहे?

एबीपी माझा वेब टीम   |  04 Jul 2018 12:20 PM (IST)
1

पावसाळा संपता संपता, ओडीकेएफही आपल्या पिलांना घेऊन पुन्हा दक्षिणेकडे उडून जातो. अगदी लाजाळू असणारा हा पक्षी घनदाट जंगलात राहणंच पसंत करतो. काही वर्षापूर्वी दक्षिणेतून कोकणात येणाऱ्या ओडीकेएफच्या जोड्यांची संख्या जास्त होती. मात्र मानवी वावर, निसर्गाला पोहचलेली हानी आणि पर्यटकांची पर्यटनस्थळांवरील गोंगाट, मस्ती यामुळं हा पक्षी आता शोधावा लागतो. अनेक पक्षीप्रेमींना याचा फोटो घेणं म्हणजे जग जिंकण्यासारखं असतं. त्यामुळं ते निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर तिथलंच होऊन जातात. आपल्यामुळं वन्यप्राणी, पक्ष्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. तरच ही वनसंपदा आहे तशा रुपात आपल्या पुढच्या पिढ्यांनाही अनुभवता येईल.

2

यावेळी पिलांना खाद्याची खूप जास्त गरज असते. खंड्या जंगलातून पाल, सरडे, बेडूक, मधमाशा, छोटे कीटक आणून या पिलांना भरवतो. अवघ्या 20 दिवसात या पिलांचं वजन चांगलंच वाढतं. आणि महिनाभरात ही पिलं उडण्याजोगी होतात.

3

मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात दक्षिणेतून आलेला हा पाहुणा जागेचा शोध घेतो. आणि चोचीने घरटं बनवतो. आणि इथंच त्यांची प्रणयक्रिडाही होते. प्रणयानंतर महिन्याभरात मादी घरट्यात 4 ते 5 अंडी घालते. नर आणि मादी दोघेही ही अंडी उबवतात. 16 ते 17 दिवसांनंतर यातून पिलं बाहेर पडतात.

4

आधी जंगलभर फिरुन हा कुठं घरटं बनवायचं याचा शोध घेतो. तिबोटी खंड्या झाडावर नाही, तर चक्क खेकड्याप्रमाणं पाण्याच्या कडेला असलेल्या मातीत बिळ म्हणजेच घरटं बनवतो. निसर्गाची किमया बघा, अगदी पाण्याजवळ घर बनवूनही याला विश्वास असतो, की ओढ्याला कितीही पाणी आलं तरी याचं घरटं सुरक्षित राहणार आणि त्याला होणारी पिल्लं जगणार.

5

पावशा किंवा चातक ज्याप्रमाणं पावसाची चाहूल देतो, त्याचप्रमाणं ओडीकेएफ आला, म्हणजे मान्सूनराजा दाखल होणार असं मानायला हरकत नाही. याचा ची ची आवाज जंगलभर घुमायला लागतो.

6

पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच तिबोटी धीवर म्हणजेच तिबोटी खंड्याची जोडी दक्षिण भारतातून कोकणातल्या जंगलात दाखल होते. पक्षीप्रेमींमध्ये हा ओडीकेएफ म्हणजेच ओरिएन्टल डॉर्फ किंगफिशर किंवा ब्लॅक किंगफिशर या नावाने प्रसिद्ध आहे. आपल्याकडच्या खंड्यापेक्षा आकारानं अगदी लहान (१३ सेंमी), मात्र विविध रंगछटांनी भरलेला हा पाहुणा दक्षिणेतून कोकणात येतो. उद्देश फक्त एकच.. प्रजनन.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ओरिएन्टल डॉर्फ किंगफिशरबद्दल तुम्हाला काय माहित आहे?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.