कुंबळेंच्या परीक्षेत अजिंक्य रहाणे पास, बाकी सगळे फेल
खरंतर गेले सहा महिने टीम इंडिया फक्त वन डे आणि ट्वेन्टी20 क्रिकेटच खेळत होती. बहुदा भारतीय फलंदाज अजूनही टी-20च्याच मूडमध्ये आहेत. पण टीम इंडियाला पुढच्या वर्षभरात प्रामुख्याने कसोटी क्रिकेट खेळायचं आहे. त्याआधी या पहिल्या चाचणी परीक्षेत भारतीय फलंदाजांची ही अवस्था मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंसाठी चिंतेची बाब ठरु शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफक्त अजिंक्य रहाणेच तासभर विकेट न गमावता खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिला.
तर केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा एक-एकदा धावचीत झाले.
शिखर धवननेही दोनदा यष्टीरक्षकाकडे झेल सोपवला. धवनचा जोडीदार मुरली विजयही दोनदा माघारी परतला.
पण एकामागोमाग एक फलंदाज इथे ढेपाळताना दिसले. विराट कोहलीने तासाभरात दोन वेळा आपली विकेट गमावली. दोन्ही वेळा जाडेजानेच त्याला बाद केलं.
अनिल कुंबळे यांनी सर्व फलंदाजांना फक्त तासभर फलंदाजी करण्याचं आव्हान दिलं. त्यांच्यासमोर लक्ष्य ठेवलं ते या एका तासात एकदाही विकेट न गमावण्याचं. माहौल अगदी कसोटी सामन्यासारखंच होतं. सर्व खेळाडू पांढऱ्या जर्सीमध्ये होते. स्कोअरबोर्ड लागलं, फिल्डिंग तयार झाली आणि फलंदाज मैदानात उतरले.
कुंबेळ यांनी टीमच्या खेळाडूंची परीक्षा घेण्याचं ठरवलं. यासाठी टीम बंगलोरपासून 40 किमी अंतरावर असलेल्या अलूर इथे दाखल झाली.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे टीमसोबत नवनवे प्रयोग करत आहेत. सराव सामन्यातही प्रयोग दिसत आहेत. त्यांच्या या प्रयोगात अजिंक्य रहाणे वगळता विराट कोहली, शिखर धवनसह जवळपास सर्व खेळाडू फेल झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -