राजधानी एक्स्प्रेसच्या तिकीटात आता एअर इंडियाचा प्रवास

राजधानी एक्स्प्रेसच्या पैशात आजपासून तुम्ही एअर इंडियाचा प्रवास करु शकणार आहात. एअर इंडियाने आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत आंतरदेशीय प्रवासासाठी ही खास ऑफर आणली आहे.
राजधानी एक्स्प्रेस ज्या मार्गांवर चालते, त्या मार्गांवरील प्रवाशांसाठी ही ऑफर उपयुक्त आहे.
एअर इंडियाची ही ऑफर केवळ एकेरी प्रवासासाठी आहे.
राजधानी एक्स्प्रेसच्या पैशात आजपासून तुम्ही एअर इंडियाचा प्रवास करु शकणार आहात. एअर इंडियाने आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत आंतरदेशीय प्रवासासाठी ही खास ऑफर आणली आहे.
या ऑफरनुसार दिल्ली ते जम्मू 2642 रुपये तिकीट शुल्क आहे. तर दिल्ली ते अहमदाबाद 3750 रुपयांत प्रवास करण्याची संधी आहे.
या ऑफरनुसार प्रवाशांना राजधानी एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लास एसी तिकीट शुल्कात एअर इंडियाचा प्रवास करता येणार आहे.
या ऑफरची तिकीटे आजपासून एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि एअरपोर्ट बुकिंग ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत.