नव्या वर्षाच्या स्वागताला शिर्डीत भाविकांची गर्दी
साईबाबा संस्थाननेही नवीन वर्षाचं स्वागत करताना साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवलं. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाशिवाय राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सपत्नीक साईंचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचा प्रारंभ केला.
दरम्यान, साईनगरीत नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. अनेक तास रांगेत उभं राहात भाविकांनी नवीन वर्षात सुख - शांती आणि स्वास्थ्यासाठी साईबाबांना साकडं घातलं.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी साई दर्शन करुन नवीन वर्षाची सुरवात केली.
काल सकाळपासूनच शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती. देशातील साई भक्तांसह परदेशातील साई भक्तांनी साई नगरीत हजेरी लावत नववर्षाचे स्वागत केलं. काल रात्रभर मंदिर उघडे असल्याने रात्री 12 वाजता साईंचं दर्शन घ्यावं या उद्देशाने भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केल्याचं प्रकर्षाने जाणवलं.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखो साईभक्तांनी साई दरबारात हजेरी लावली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -