काय आहेत नवीन मोटर वाहन कायद्यातील सुधारणा?
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2017 12:23 PM (IST)
1
मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 10 लाख, तर जखमींना 5 लाखांची भरपाई
2
रस्ते अपघातातील पीडितांना मिळणारी नुकसान भरपाई वाढणार
3
वाहन परवाना आणि वाहन नोंदणीला आधार कार्डशी जोडणार
4
हिट अँड रन प्रकरणात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई
5
अल्पवयीन चालकामुळे अपघात झाल्यास त्याच्या पालकाला 25 हजाराचा दंड किंवा 3 वर्षांची शिक्षा
6
अल्पवयीन गाडी चालवत असल्यास, त्या गाडीची नोंदणी रद्द होणार
7
गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास 5 हजार रुपयांचा दंड
8
दुचाकीवर बसलेल्या चार वर्षांवरील लहान मुलांसाठी हेल्मेट सक्ती
9
तसंच हेल्मेट न वापरल्यास तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्दही केला जाऊ शकतो.
10
मोटार वाहन कायदा सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार आहे. यात दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यास 1 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.