नील नीतिन मुकेशचं आज शुभमंगल!
रुक्मिणी ही हवाई उद्योग क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती आहे.
न्यूयॉर्क, जेल, लफंगे परिंदे, प्रेम रतन धन पायो, वझीर यासारख्या चित्रपटात तो झळकला होता.
नील नितीन मुकेशने जॉनी गद्दार चित्रपटातून 2007 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे 11 ऑक्टोबरला दोघांचा साखरपुडा झाला होता.
मुंबईतील जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये 17 फेब्रवारीला नील आणि रुक्मिणीच्या लग्नाचं भव्य रिसेप्शन होणार आहे.
9 फेब्रुवारीला रॅडिसन ब्ल्यूमध्ये दोघांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. दोघांच्या घरातील पाचशे पाहुणे या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.
मंगळवारी नील आणि रुक्मिणीचा साखरपुडा झाला, तर बुधवारी मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला.
रुक्मिणी सहाय आणि नीलचं अरेंज मॅरेज आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश गुरुवारी विवाहबंधनात अडकणार आहे.