नेहराचा ‘हा’ रेकॉर्ड अजूनपर्यंत कुणीही मोडला नाही!
आशिष नेहराने 1999 मध्ये श्रीलंकेविरोधातील कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2000 सालाआधी क्रिकेटमध्ये पदार्पण करुनही अद्याप क्रिकेटमध्ये सक्रीय असलेल्या निवडक खेळाडूंमधील आशिष नेहरा एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआशिष नेहराने वन डे क्रिकेटमध्ये दोन वेळा 6 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे आणि असा विक्रम नावावर असलेला नेहरा हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. एकदा इंग्लंड आणि एकदा श्रीलंकेविरोधात नेहराने या विक्रमांची नोंद केली. इंग्लंडविरोधात 2003 सालच्या वर्ल्डकपमध्ये 23 धावा देऊन 6 विकेट घेतल्या होत्या.
टीम इंडियचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा एक असा खेळाडू आहे, जो कधीही खचून जात नाही. अनेकदा दुखापतीमुळे तो टीममधून बाहेर राहिला. मात्र, नव्या जोमाने पुनरागमनाची तो तयारीही करतो. आम्ही तुम्हाला आज नेहराचा असा एक रेकॉर्ड सांगणार आहोत, जो अजूनपर्यंत कुठल्याही भारतीय गोलंदाजाने मोडला नाही.
नेहराच्या क्रिकेट करिअरमधील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येतं की, 120 वन डे सामन्यांमध्ये 157 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. नेहराने 17 कसोटी सामन्यांमध्ये 44 विकेट्स, 26 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 34 विकेट्स, तर आयपीएलमधील 87 सामन्यांमध्ये 106 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -