महिलांना असं कॉम्प्लिमेंट देतोस? ट्विटरवर नेहाचा संताप
संबंधित ट्वीट कोट करुन तिने आपला संताप व्यक्त केला. 'महिलांचं अशाप्रकारे कौतुक करतात का? किळस आहे. लाज वाटायला हवी' अशा शब्दात तिने त्याला झापलं.
विशेष म्हणजे मस्त इन्सान या यूझरचं ट्विटर अकाऊण्ट डिलीट करण्यात आलं आहे. त्याच्यावर सायबर क्राईम अंतर्गत काय कारवाई होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊण्टवरुनही या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्यात आली. पोलिसांनी नेहाला सायबर पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितलं.
अमृता खानविलकर, श्रुती मराठे, समीर कक्कड, जितेंद्र जोशी यासारख्या कलाकारांनीही नेहाला पाठिंबा देत आरोपीला धारेवर धरलं.
नेहा पेंडसेच्या हिमतीला अनेकांनी दाद दिली. अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेने नेहा पेंडसेसोबत मुंबई पोलिसांना टॅग केलं आणि टवाळाची तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला.
मस्त इन्सान (@mast_insaan) असं ट्विटर हँडल असलेल्या एका व्यक्तीने अभिनेत्री नेहा पेंडसेच्या ट्विटर अकाऊण्टवर अश्लील कमेंट केली. अनेक कलाकार अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात, मात्र नेहाने या टवाळखोराला धडा शिकवण्याचं मनावर घेतलं.
अभिनेत्री नेहा पेंडसेच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवर एका टवाळखोराने उच्छाद मांडल्याचा प्रकार समोर आला.