लग्नाच्या तीन महिन्यांनंतर नेहा-अंगदकडून गुड न्यूज

37 वर्षीय नेहा धुपियाने याच वर्षी 10 मे रोजी दिल्लीतील गुरुद्वारात आपल्या काही नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत 35 वर्षीय अंगद बेदीसोबत गुपचूप लग्न गेलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अखेर लग्नाच्या तीन महिन्यानंतर दोघांनी ही गुड न्यूज सोशल मीडियावरुन दिली. यानंतर युझर्सनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

लग्नानंतर नेहाच्या कपड्यांवर लक्ष दिलं तर ती कायम सैल कपड्यांमध्येच दिसत होती, जेणेकरुन ती गर्भवती असल्याचं कळू नये.
मात्र कधी त्यांनी हे वृत्त फेटाळलं तर कधी दोघांनी मौन बाळगणं पसंत केलं होतं.
प्रेग्नंट असल्याने नेहा आणि अंगदने गडबडीत लग्न केल्याची चर्चा रंगली होती.
नवी सुरुवात होत आहे, आम्ही तिघे...सतनाम वाहे गुरु, असं कॅप्शन अंगदने फोटो शेअर करताना दिलं आहे. तर नेहाने देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवर याच कॅप्शनसह काही फोटो पोस्ट केले आहेत.
अंगद बेदीने शुक्रवारी रात्री गर्भवती नेहा धुपियासोबतचे काही फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आई बनणार आहे. नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदीने आपल्या पहिल्या बाळाबद्दलची गूड न्यूज सोशल मीडियावरुन दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -