मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानींचं सेलिब्रेशन
मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना पुण्यासमोर अवघ्या 130 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पुण्याला फक्त 128 धावांपर्यंतच मजल मारता आली.
पण शेवटच्या क्षणी खेळ उंचावत मुंबई इंडियन्सनं आयपीएलचं जेतेपद पटकावलं.
अजिंक्य रहाणे आणि कर्णधार स्मिथ यांचा अपवाद वगळता पुण्याचे इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही.
रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवत मुंबईने तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावलं.
यावेळी संघ मालकीण निता अंबानी यांनाही आपल्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी थेट मैदानातच धाव घेतली.
हा सामना प्रचंड उत्कंटावर्धक झाला होता. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कोण जिंकणार हे समजणं कठीण होतं.
आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं अगदी शेवटच्या क्षणी पुण्याचा विजयाचा घास हिसकावून घेतला.
हैदराबादच्या राजीव गांधी मैदानात शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. अवघ्या एका धावेनं विजय मिळवत मुंबईनं पुणेवर मात केली.