✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सिडकोची बम्पर लॉटरी, नवी मुंबईत घरं

एबीपी माझा वेब टीम   |  12 Aug 2018 01:27 PM (IST)
सिडकोची बम्पर लॉटरी, नवी मुंबईत घरं
1

सिडको (शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ) च्या माध्यमातून घरांची बम्पर लॉटरी जाहीर होणार आहे. सिडकोने एकाच वेळी तब्बल 14 हजार 838 घरांची लॉटरी काढली असून याचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी होणार आहे.

2

50 हजार रूपयांपेक्षा जास्त पगार असणाऱ्या व्यक्तिंना या योजनेत सहभागी होता येणार नाही. या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे.

3

आर्थिक दुर्बल गटासाठी उत्पन्न मर्यादा ही 25 हजार रूपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ही मर्यादा 25 हजार ते 50 हजार रुपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे.

4

येत्या 13 ऑगस्ट रोजी घरांची लॉटरी निघणार आहे. यासाठी 15 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 18 लाखांचे घर असून 25.81 चौ.मी. एवढं क्षेत्र आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी 26 लाखांच्या घराचा एरिया 29.82 चौ.मी. आहे. लॉटरीच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या या घरांचा ताबा 2019 च्या शेवटी देण्यात येणार आहे.

5

नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने घरे उभारलेली आहेत. एमएमआरडीए रेंजमध्ये म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली भागात ज्यांच्या नावावर घर आहे, त्यांना या घराचा लाभ घेता येणार नाही.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • सिडकोची बम्पर लॉटरी, नवी मुंबईत घरं
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.