महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मदरशात ध्वजारोहण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजामिया मदरशातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम नक्कीच देशातील अनेकांना महत्त्वाचा संदेश देणारा ठरेल, यात शंका नाही.
विविधतेत एकता असणारा आपला भारत देश आहे. याच विविधतेतील एकतेचा प्रत्यय आज अक्कलकुवात आला.
धार्मिक शिक्षण आणि व्यवसायिक शिक्षणा यांचा मेळ घालणाऱ्या अक्कलकुवातील जामिया संस्थेच्या आवारात यंदा 15 हजार विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण करत देशात भक्ती आणि एकतेचा संदेश दिला.
देशभर भारताचा 70 व्या स्वातंत्र्यदिनाची धामधूम आहे. मोठ्या उत्साहात देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो आहे. नंदूरबारमधील अक्क्लकुवामधील जामिया मदरशामध्ये तब्बल 15 हजार मुस्लिम मुलांनी एकत्रित ध्वजरोहण करीत देशाला एकतेचा संदेश दिला.
देशभरात सध्या अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. शिवाय, देशद्रोही शक्तींचा समाना करण्याचं आव्हानही देशासमोर आहे. मात्र, असे असतानाही देशातील कुणा घटकाला दोषी मानून चालणार नाही, याचं उदाहरण म्हणजे अक्कलकुवामधील जामिया संस्था.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -