राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मराठी सिनेमांचा दबदबा
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – शिवाय
सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट – पिंक
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी ( दशक्रिया)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम ( दंगल )
आधारित पटकथा – दशक्रिया
सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- नीरजा
कासव हा मराठी चित्रपट सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही.
यंदाचा सर्वोत्तम अभिनेता म्हणून रुस्तमफेम अक्षय कुमारला मान मिळाला. रुस्तममधील लाजवाब अभिनयाबद्दल अक्षय कुमार सर्वोत्तम अभिनेता ठरला.
दुसरीकडे नीरजा सिनेमातील अप्रतिम अभिनयासाठी सोनम कपूरला विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला.
राजेश मापुस्करांच्या व्हेंटिलेटर या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलन आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
राष्ट्रपतींच्या हस्ते 3 मे रोजी दिल्लीत पुरस्कारांचं वितरण होईल.याशिवाय दशक्रिया हा मराठीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
यंदाच्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा दबदबा पाहायला मिळाला. कासव या मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांची शर्यत जिंकत, अव्वल क्रमांकाचं सुवर्णकमळ पटकावलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -