भुजबळांना जामीन; नाशकात आतषबाजी, पेढे वाटून समर्थकांचा जल्लोष

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर येणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वाढतं वय आणि ढासळती प्रकृती लक्षात घेत पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.
नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भुजबळ समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करुन जल्लोष केला.
भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद व्यक्त केला.
छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नाशिकमध्ये समर्थकांनी एकच जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर येणार आहेत.