...जेव्हा पोलिस बॉडीबिल्डिंग करतात!
जानेवारी 2019 मध्ये जयपूरला होणाऱ्या ऑल इंडिया पोलिस गेम्ससाठी या निवड चाचणीतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे. निवड चाचणीचा पहिलाच मान नाशिक शहराला मिळाल्यामुळे शहर पोलिसांकडून याची जय्य्त तयारी करण्यात आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये यावर्षी प्रथमच शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारचा समावेश झालाय. त्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलिस शरीरसौष्ठव निवड चाचणी नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात पार पडली. नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर नाशिकसह महाराष्ट्रातील 13 ठिकाणाहून विविध वजनीगटातील 59 पोलिस कर्मचारी सहभागी झालेत.
पाहा आणखी फोटो....
आजवर अनेक बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा तुम्ही बघितल्या असतील, मात्र नाशिकमध्ये पार पडलेली ही स्पर्धा सर्वार्थाने लक्षवेधी ठरली. कारण या स्पर्धेत पोलीस दलातीलच बॉडी बिल्डर बायसेप ट्रायसेप दाखवत होते. (फोटो सौजन्य : अशोक गवळी)
अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये यावर्षी प्रथमच शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारचा समावेश झाला असून, त्यासाठी निवड चाचणीचा पहिलाच मान नाशिक शहराला मिळाल्यामुळे शहर पोलिसांकडूनही याची जय्यत तयारी करण्यात आली होती.
पाहा आणखी फोटो....
पाहा आणखी फोटो....
पाहा आणखी फोटो....
पोलिस म्हटल की आपल्या डोळ्यासमोर ढेरपोटे पोलीस अशीच प्रतिमा उभी राहते. मात्र पोलीस दलाची ही ओळख बदलत चालली आहे. अंगाला तेल चोपडलेले पिळदार शरीरयष्टी असणारे सिक्स पॅक दाखवणारे हे सर्व स्पर्धक पोलीस कर्मचारी आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -