नाशिकमधील अतिक्रमणविरोधी सर्वात मोठी कारवाई पूर्ण
भंगार बाजाराचं हे अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी गेली 17 वर्षे दिलीप दातीर यांनी न्यायालयीन लढा दिला
कायदा-सुव्यवस्था आणि पर्यावरणासाठी घातक ठरत असलेला हा अनधिकृत भंगार बाजार निघाला हा कायद्याचा विजय आहे. पण केवळ दुकानं उद्ध्वस्त न करता हे अतिक्रमण समुळ नष्ट करावं अन्यथा पुन्हा भंगार व्यावसायिक अतिक्रमण उभं करतील अशी भीती शिवसेनेचे दिलीप दातीर यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे पहिल्यांदाच अशा एखाद्या कारवाईत पोलीस प्रशासनाकडून ड्रोनचा वापर करण्यात आला होता.
सुमारे एक हजार पोलीस आणि महापालिका कर्मचारी, शंभरहून अधिक जेसीबी, पोकलेन, वाहनं यांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली.
4 दिवस चाललेल्या या कारवाईत तब्बल 800 हून अधिक अनधिकृत दुकानं, गोदामं जमिनदोस्त करण्यात आली.
नाशिकमधल्या अनधिकृत भंगार बाजारावर करण्यात आलेली ऐतिहासिक अतिक्रमण विरोधी कारवाई मंगळवारी पुर्ण झाली.