पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 20 मुद्दे
आम्ही टाळणं नाही, टक्कर देणं जाणतो. वन रँक वन पेन्शनचं महाकाय काम आम्ही पूर्ण केलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदलित, वंचित असो, आदिवासी, साक्षर किंवा निरक्षर, सर्व आमचं कुटुंब
जीएसटीच्या माध्यमातून करप्रणालीत समानता आणण्याचा प्रयत्न
बाळाच्या पालनपोषणासाठी प्रसूती रजा 26 आठवड्यांची केली
आधीच्या सरकारच्या उणिवा दूर करुन आम्ही पुढे जात आहोत
स्पष्ट धोरण, पारदर्शकतेमुळे आमचं सरकार बेधडक निर्णय घेत आहे
पोस्ट ऑफिसला पेमेंट बँक बनवण्याचा प्रयत्न,पोस्ट ऑफिसला पुनरुज्जीवित करणार
इको-फ्रेंडली गणेशोत्सव ही देखील समाजसेवाच आहे.
शेतकऱ्याला पाणी मिळालं तर तो मातीतून सोनं उगवेल, जलसिंचन योजनेचा आवाका वाढवणार
प्रत्येकाने आपल्या घरात एलईडी बल्ब लावून विजेची बचत करावी
कमी वेळात देशातील गावात 2 कोटीहून अधिक शौचालयं बनली आहेत
कायद्याचं जंजाळ लोकांसाठी अडचणीचं ठरतंय, आम्ही त्यात सुसुत्रीकरण करतोय, कायदे कालसुसंगत बनवतोय
क आणि ड वर्गातल्या तब्बल ९ हजार सरकारी पदांसाठी मुलाखतीची पद्धत रद्द केलीय, थेट भरतीमुळे पारदर्शकता
आधी दिवसाला ७० ते ७५ किमीचे रस्ते बनत होते, आमच्या सरकारमध्ये दिवसाला १०० किमी रस्ते बनत आहेत
आता आठवडाभरात पासपोर्ट मिळतो, 2015-16 या वर्षात आम्ही पावणे दोन कोटी पासपोर्ट वितरित केले
सरकारची नव्हे, देशाची इमेज महत्त्वाची
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं. मोदींच्या भाषणातील मुद्दे -
देशात लाखो अडचणी आहेत, पण त्यावर उपाय शोधणारी सव्वाशे कोटी जनता आहे
उपनिषद ते उपग्रह, महाभारतातला भीम ते भीमराव, सुदर्शन चक्रधारी मोहन ते चरखा चक्रधारी मोहन हा भारताचा इतिहास आहे
अगणित महापुरुषांचा स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष,त्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेतोय
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -