PHOTO : नारायण राणे, नितेश आणि मुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास
त्याचवेळी राणेंनी राज्यातल्या पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राणेंचा अहमदाबाद दौरा हा कमालीचा लक्षवेधी ठरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री चार्टर्ड विमानाने मुंबईला रात्रीच परत आले. राणे पितापुत्र मात्र रात्रभर अहमदाबादमध्येच थांबले होते. त्यानंतर सकाळी विमानाने दोघे मुंबईत दाखल झाले.
काही दिवसांपूर्वीच नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी माझानं दिली होती. पण त्यावेळी राणे यांनी आपल्या भाजपप्रवेशाची शक्यता फेटाळून लावली होती.
खासगी कामासाठी अहमदाबादला गेल्याचा दावा करणाऱ्या राणेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कशाला सोबत लागतात, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानाहून मुख्यमंत्र्यांची गाडी निघाली. त्यामुळे तिघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची उत्सुकता कायम आहे.
खासगी कामासाठी अहमदाबादला जाऊ शकत नाही का, असा सवाल करणाऱ्या काँग्रेस नेते नारायण राणेंप्रकरणी नवा गौप्यस्फोट हाती आला आहे. दस्तुरखुद्द नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत प्रवास करताना 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
दृष्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच सीटवर बसलेले स्पष्ट दिसत आहेत. तर ड्रायव्हरच्या शेजारील सीटवर नितेश राणे बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -