...आणि नंदूरबारमध्ये मोठी दुर्घटना टळली!
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2016 08:41 AM (IST)
1
यामुळे नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील रंगावली नदीला पूर आला आहे. याच पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली होती.
2
गुजरातच्या सीमेलगत असलेल्या अहावा डांग जंगल परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे.
3
त्यानंतर गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत जेसीबीच्या साहाय्याने बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं.
4
एमएच 20 बी एल 2610 ही एसटी बस रंगावली नदीत वाहून जात होती. मात्र यावेळी प्रवाशांनी प्रचंड आरडाओरडा केला.
5
स्थानिकांच्या मदतीने एसटीमधील 17 जणांना वाचवण्यात यश आलं. आज सकाळी 6:30 वाजता ही घटना घडली.
6
नंदूरबारमध्ये महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली. नवापूर तालुक्यात एसटी बस नदीत वाहून जाताना थोडक्यात बचावली.
7
दरम्यान, यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.