उर्मिला-आदिनाथच्या छकुलीचं बारसं, नाव ठेवलं...
या नव्या पाहुण्याच्या आगमनाने कोठारे कुटुंब प्रचंड खूश झाले आहेत. सध्या त्यांचा सगळा वेळ हा या चिमुकलीच्या अवतीभवतीच जात आहे.
डोहाळे जेवण असो किंवा पेंच अभयारण्यातील उर्मिला आणि आदिनाथ यांचा बेबीमून...या सगळ्यामुळं उर्मिलाचं गरोदर असणं मात्र चांगलेच चर्चेत होते.
महेश कोठारे यांनीही नातीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जातं.
गरोदरपणातही उर्मिला सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह होती. त्यामुळे आता त्यांच्या घरी आलेल्या या चिमुकलीच्या आगमनाने कोठारे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
महेश कोठारे, आदिनाथ आणि उर्मिला यांनी आपापल्या ट्विटर अकाऊंटवर चिमुकल्या जिज़ाच्या बारशाचे फोटो शेअर केले आहेत.
कोठारेंच्या छकुलीचं बारसं नुकतंच झालं. आदिनाथ आणि उर्मिलाने लाडक्या लेकीचं नाव 'जिज़ा' ठेवलं आहे.
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात जानेवारीला नव्या पाहुण्याचे आगमन झालं असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (सर्व फोटो ट्विटर अकाऊंट)