नागपूर मेट्रोचा 5 किमीचा इंटर्नल ट्रायल रन यशस्वी
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2017 10:44 AM (IST)
1
नागपूर मेट्रोचं पहिल्या टप्प्यात मिहान डेपो ते ऑटोमोटिव्ह चौक मार्गाचं काम वेगानं सुरु आहे. या मार्गाचं काम पूर्णत्वाकडे असून लवकरच नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
2
खापरी परिसरातील मिहान डेपोजवळ सुमारे 5 किमीचा हा ट्रायल रन होता. हा इंटर्नल ट्रायल रन असल्यानं त्यात केवळ अधिकारी आणि कर्मचारीच उपस्थित होते.
3
4
नागपूरमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्याचाच ट्रायल रन काल शनिवारी घेण्यात आला.