विदर्भातील सौंदर्य झळकलं मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून आणि राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद - सिंगल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकारला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिरवी झेंडी दाखवून त्यांनी या सुशोभित एक्सप्रेसला रवाना केले. विविध रेल्वे एक्सप्रेसवर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची अशीच जाहिरात करुन देशभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करु, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
विदर्भातील प्रसिद्ध अभयारण्य नागझिरातील सौंदर्य आता डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर दिसणार आहे.
एमटीडीसीच्या या उपक्रमातून दख्खनची राणी आता वेगळ्या स्वरुपात जनतेसमोर येत आहे. पर्यटनस्थळांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीची ही फारच चांगली संकल्पना आहे. पर्यटक आले तर त्यांच्यामार्फत स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
एक्सप्रेसवर नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गचित्रांसह एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही झळकली आहेत.
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -