✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'यती' खरंच अस्तित्त्वात आहे? भारतीय सैन्याकडून पायांच्या ठशांचे फोटो ट्वीट

एबीपी माझा वेब टीम   |  30 Apr 2019 09:02 AM (IST)
1

'यती'चं वर्णन दोन पायांवर चालणारा अवाढव्य वानर अशा स्वरुपात केलं जातं. तो मानवाचा पूर्वज मानला जातो.

2

1832 साली पहिल्यांदा एका गिर्यारोहकाने उत्तर नेपाळमध्ये दोन पायांवर चालणारं महाकाय वानर पाहिल्याचा दावा केला होता. त्यामुळे दंतकथांमधून आढळणारा हिममानव गांभीर्याने घेतला जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

3

बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या हिममानवाबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. मात्र पहिल्यांदाच भारतीय सेनेने हिममानव प्रत्यक्षात असल्याची शक्यता अधिकृतपणे वर्तवली आहे. बर्फामध्ये दिसणाऱ्या हिममानवाच्या पाऊलखुणांचे फोटो सैन्याने ट्विटर हँडलवरुन ट्वीट केले आहेत.

4

मकालू-बारुन नॅशनल पार्कच्या याच परिसरात पूर्वीही हिममानवाचं ओझरतं दर्शन घडल्याचा दावा करण्यात आला होता.

5

नेपाळ-चीन सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ 9 एप्रिल 2019 ला ही गोष्ट सैन्याच्या निदर्शनास आली. या भागात आढळणाऱ्या कुठल्याच प्राण्याच्या पावलांचे ठसे या आकाराचे नसल्यामुळे भारतीय सैन्य चाट पडलं आहे.

6

गिर्यारोहण मोहिमा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या पथकाने रहस्यमय वाटणाऱ्या भल्या मोठ्या पावलांचे ठसे पाहिल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'यती' म्हणजेच पुराणकथांमधील दैत्याच्या पावलांचे 32 गुणिले 15 इंच आकाराचे ठसे पहिल्यांदाच पाहण्यात आल्याचा दावा सैन्याने केला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'यती' खरंच अस्तित्त्वात आहे? भारतीय सैन्याकडून पायांच्या ठशांचे फोटो ट्वीट
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.