'सुलतान' सलमानची बीएमसीच्या वृक्षारोपण कार्यक्रमाला हजेरी

बॉलिवूड स्टार सलमान खानचा 'सुलतान' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. सलमानने नुकतंच बीएमसीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
सलमानने ट्विटरवर कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.
सलमानने या कार्यक्रमाला हजेरी लावून हरित मुंबई, हरित महाराष्ट्राला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी कृषी दिनाला 2 कोटी वृक्षांची लागवड केली.
महाराष्ट्र शासन सध्या वृक्षारोपण सप्ताह साजरा करत आहे.
चिमुकल्यांसह सलमानने वृक्षारोपण कार्यक्रमाला हजेरी लावली.
सलमानने महाराष्ट्र शासनाच्या 2 कोटी वृक्ष लावण्याच्या अभियानाला पाठिंबा असल्याचं सांगितलं.
सलमानने नुकताच बीएमसीच्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.
बॉलिवूड स्टार सलमान खानचा 'सुलतान' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. सलमानने नुकतंच बीएमसीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.