पुण्यात 'कालवा' : भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले!
नेकांचं कौटुंबीक साहित्य उद्ध्वस्त झालं. अचानक पाणी आल्याने नेमकं काय होतंय हे कळलं नाही. अक्षरश: घराच्या भिंती कोसळल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजनता वसाहतीमध्ये बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलं आहे. त्या वस्तीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु आहे.
सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडणं थांबवलं आहे. महापालिकेचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळे रस्त्यावर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरलं.
सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली.
पाणी प्रचंड वेगाने वाहात दांडेकर पूल आणि परिसरात पोहोचलं. काहीवेळातच रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं.
पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून हा पाण्याचा प्रवाह सुरु होता. तो भाग उंचीवर असल्याने आणि पाण्याचा वेग प्रचंड असल्याने रस्ते अक्षरश: पाण्यात बुडाले
दांडेकर पूल परिसरात बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. थेट घरांत पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
फुटलेल्या पुलाचं पाणी दांडेकर पुलावर आलं आहे. रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह हा इतका वेगात आहे की, त्या पाण्यात उभं राहण्यासाठी आधार घ्यावा लागतो.
या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली.
दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं आहे. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली आहे.
भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभऱ पाणी जमा झालं. त्यामुळे नेमकं काय झालंय हे लोकांना कळलंच नाही.
दरम्यान, डागडुजी न केल्याने कालव्याची भिंत फुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पर्वती भागात मुठा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे.
पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने पाणी रस्त्यावर येत आहे. पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -