काशीतल्या मुस्लीम महिलांकडून मोदींसाठी खास राखी
२०१३ साली या महिलांनी पहिल्यांदा मोदींना राख्या पाठवून वारणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवावी असे आवाहन केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया महिलांनी राख्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र लावून त्याला अकर्षक रुपात सजवले आहे.
या महिला गेल्या ४ वर्षांपासून पंतप्रधानांना राख्या पाठवतात.
त्यामुळे पंतप्रधानांनचा वाराणसी हा मतदारसंघ असल्याने त्यांनी स्वत: लक्ष घालून शहरातील समस्या दूर कराव्यात अशी विनंतीही केली.
श्रावण महिन्यात काशी विश्वानाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे.
यावेळी स्त्रियांनी पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठीची प्रार्थना केली.
या कार्यक्रावेळी मुस्लीम महिलांनी ढोलकीच्या ठेक्यावर पारंपरिक गीते सादर करत राख्या तयार केल्या.
तसेच यावेळी पंतप्रधानांकडून शहराला दुरवस्थेतून मुक्त करण्याचे वचनही मागितले.
या कार्यक्रमावेळी महिलांनी तयार केलेल्या राखी पंतप्रधानांना पाठवल्या.
मुस्लीम महिला फाउंडेशनच्यावतीने यासाठी शनिवारी 'मोदी राखी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाराणसी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदार संघातील मुस्लीम महिलांनी रक्षाबंधानानिमित्त पंतप्रधानांना खास राख्या तयार करून पाठवल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -