‘मुंबई श्री’वर सुजल पिळणकरचा कब्जा
गिरणी कामगाराचा मुलगा असलेला सुजल पिळणकरला मुंबई श्री आपणच जिंकणार हा विश्वास होता आणि त्याने तो खरा करूनही दाखवला. गेले सात वर्षे व्यायामशाळेत घाम गाळणाऱया सुजलला आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचवायचे आहे. मुंबई श्री हे त्याचे पहिले दमदार पाऊल आहे. ‘मुंबई श्री पर्यंत मी अत्यंत खडतर प्रवास करून पोहोचलोय. या मोसमात सलग सहा स्पर्धा जिंकल्यामुळे मी फॉर्मात होतोच. या स्पर्धांच्या पुरस्काराच्या जोरावरच मी मुंबई श्रीची जोरदार तयारी करू शकलो. आता मला महाराष्ट्र श्री आणि भारत श्रीमध्येही चांगली कामगिरी करायची आहे. पण जोपर्यंत माझ्या मेहनतीला बळ आणि प्रोत्साहन देणारी मला नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी स्वताला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. आमच्या खेळात सर्व सोंगं घेता येतात, पण पैशाचं घेता येत नाही. शरीरसौष्ठवासाठी पैशाचं ऑक्सिजन लागते. नोकरी लागली तरच मला ते मिळू शकेल.’ असं सुजल यावेळी म्हणाला.
मुंबई श्रीचा पुरस्कार वितरण सोहळा खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसुळ, पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत पार पडला.
युवासेना आणि शिवतेजच्या या दिमाखदार सोहळ्याला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आवर्जून भेट दिली आणि सिद्धेश कदम यांचे भरभरुन कौतुकही केले.
प्रत्येक गटातून निवडण्यात आलेले सर्वच खेळाडू आपापल्या गटांचे विजेते वाटत होते. जजेसने खेळाडूंच्या प्रत्येक पीळदार अंगाचे गुणात्मक निरीक्षण करून निकाल जाहीर केला आणि त्यांच्या निकालावर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात शिक्कामोर्तब केले.
दृष्ट लागण्याजोगं झालेलं दिमाखदार आयोजन आणि शरीरसौष्ठवपटूंची पीळदार शरीरयष्टी पाहून तहानभूक विसरलेल्या तब्बल पाच हजार क्रीडाप्रेमींना मुंबई श्रीचा पीळदार आणि दमदार थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.