महापौर बंगल्यात आवराआवर सुरु
हेरिटेज ग्रेड 2 प्रॉपर्टी, आलिशान ग्राऊंड प्लस वन वास्तू, मागे समुद्रकिनारा, बंगल्याबाहेर विस्तीर्ण मोकळा प्रदेश, अद्ययावत सुरक्षायंत्रणा, मोठे प्रवेशद्वार, वरच्या मजल्यावर तीन दालन, महापौरांचं दोन बेड रुम निवासस्थान, एक अभ्यंगताच्या बैठकीची खोली, तळ मजल्यावर कॉन्फरन्स रुम, पोचखाना (हॉल) असा हा महापौर बंगला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवाजी पार्कवरील बंगल्याचा परिसर हा 40 हजार चौरस फूट क्षेत्रफळ आहे. मालाडमधल्या खदानीतून आणलेल्या दगडापासून बंगला बांधण्यात आला आहे. परिसरात 38 नारळाची झाडं आणि प्रशस्त बाग असून गुलमोहर, पारिजात, वड आणि आंब्याची झाडं इथे आहेत.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या बंगल्यात आवराआवर सुरु झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला जागा देण्यासाठी शिवाजी पार्कवरील महापौर बंगला रिकामा करण्याचं काम सुरु आहे.
शिवाजी पार्कवरील महापौर बंगल्याच्या जागेवर लवकरच बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधण्यात येणार आहे. या स्मारकाच्या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांची उपस्थित राहण्याची इच्छा असल्याचं महापौर म्हणाले.
येत्या आठवड्यात महापौर विश्वनाथ महाडेश्वर नवीन घरात राहायला जाणार आहेत. भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेमधील बंगला हे महापौरांचं नवं वास्तव्याचं ठिकाण असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -