तेच लोकेशन, तेच सीन, तेच गाणं, चिमुकले 'सैराट'!
नागराज मंजुळेचा 'सैराट' सिनेमा प्रदर्शित होऊन चार महिने उलटले, मात्र प्रेक्षकांमधील क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. आर्ची-परशाची प्रेमकहाणी अनेकांचा मनात कायम आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वी सैराटच्या गाण्यावर प्री-वेडिंग व्हिडीओचा ट्रेण्ड होता. त्यातच आता 4-5 वर्षांच्या चिमुरड्यांना घेऊन 'सैराट झालं जी' हे जसंच्या तसं शूट केलं आहे.
बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम मोडणाऱ्या 'सैराट'मधली गाणी प्रत्येकांच्या ओठांवर आहेत. लग्नाची वरात असो किंवा शाळा-कॉलेजचं गॅदरिंग, 'सैराट'चं एकतरी गाण वाजल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होतं नाही. आता प्री-वेडिंग व्हिडीओनंतर आता किड्स व्हर्जनही यू ट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.
महत्त्वाचं म्हणजे 12 ऑगस्ट अपलोड केलेल्या या व्हिडीओला 19 दिवसात तब्बल 2 लाख 10 हजारांहून अधिक व्ह्यूव मिळाले आहेत.
सुयश वाघमारे या तरुणाने चिमुड्यांच्या गाण्याचा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. तर सोहम पिसडूरकरने परशा आणि श्रावणी कापसेने आर्ची साकारली आहे.
गाण्यातील तेच लोकेशन, तेच सीन हूबेहूब या व्हिडीओमध्ये चित्रीत करण्यात आले आहेत. मात्र यातील आर्ची-परशा वेगळे आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -