Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पत्नीला अर्धांगवायू, 3 वर्षांच्या मुलाला मांडीवर घेऊन रिक्षाचालकाचा संघर्ष
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोहम्मह सईदचा कुटुंबियांप्रती असलेला जिव्हाळा, त्याची जिद्द, आणि संघर्ष पाहून, त्याच्यावर संकट लादणारी नियती देखील नक्कीच खजील झाली असेल.
पती मोहम्मद सईदची धडपड पाहून यास्मिनच्या मनात काळजी आणि अभिमानाचे भाव एकत्र दाटून येतात.
मुंबईच्या वर्सोवामध्ये वास्तव्यास असणाऱ्या मोहम्मद सईदचं स्वतःचं घर नाही. मित्राच्या मदतीने त्याला भाड्याचं घर मिळालं. दर दोन तासांनी पत्नीच्या मदतीसाठी त्याला घरी फेरी मारावी लागते.
सईदचा 3 वर्षांचा मुलगा मुझ्झमील वडिलांचा हा संघर्ष दररोज त्याच्या कुशीत बसून अनुभवतोय. आपल्या मुलाला सोबत घेऊन रिक्षा चालवणाऱ्या मोहम्मद सईदची पत्नी यास्मिनला अर्धांगवायुचा झटका आला आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो परप्रांतीय मुंबईत रिक्षा चालवतात. मात्र मोहम्मद सईदच्या रिक्षाची चाकं फक्त त्याच्या कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी फिरत नाहीत. तर नियतीने लादलेल्या संकटाला कायमचा ब्रेक लावण्यासाठी त्याचा हा संघर्ष सुरु आहे.
त्यामुळं सईदला पत्नीचं आजारपण, मुलांची काळजी आणि रिक्षा अशा तिहेरी जबाबदाऱ्या एकाच वेळी पेलाव्या लागत आहेत. मात्र धीर ढासळू न देता, फक्त मेहनतीच्या जीवावर आलेलं संकट परतवून लावण्याचा निर्धार या जिगरबाज रिक्षाचालकाने केला आहे.
मुंबईत एक रिक्षाचालक त्याच्या तीन वर्षाच्या मुलाला मांडीवर घेऊन रिक्षा चालवतो. कारण त्याच्या पत्नीला अर्धांगवायू आहे. त्यामुळी ती मुलाला सांभाळू शकत नाही. म्हणून रिक्षाचालक आई आणि वडील दोघांचीही भूमिका पार पाडत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -