रस्त्यांना स्विमिंग पूलचं रुप, मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं!

मुंबईत मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाची बॅटिंग सुरु झाली आहे. मध्य मुंबईसह पश्चिम आणि पूर्व उपगनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. किंग्ज सर्कल, हिंदमाता, अंधेरी सब वे, वाकोला आणि कुर्ला वेस्ट या सखल भागात पुन्हा पाणी साचलं आहे. खरंतर गुरुवारी आणि शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसाने काल मुंबईत उघडीप घेतली होती. मात्र आज पुन्हा पावसाची संततधार सुरु झाल्याने सखल भागात पाणी साचलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सायन स्टेशनवर ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

प्रतीक्षानगर सायनमध्येही पावसामुळे पाणी साचलं आहे.
किंग्ज सर्कलमध्ये गाड्यांना पाण्यातून वाट काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदमातमध्ये पाणी साचण्याची परंपरा कायम राहिली आहे.
मुसळधार पावसामुळे चेंबुरमध्ये गुडघाच्या वर पाणी साचलं आहे.
वांद्र्यात रस्ते जलमय झाले आहेत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -