मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग, रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम

गेल्या 24 तासात मुंबईत 165.8 मिमी तर उपनगरात 184.3 मिमी पावसाची नोंद, विरारमध्ये 24 तासात 235 मिमी तर वसईत पाऊस 299 मिमी पावसाची नोंद
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेली पावसाची संततधार थांबायचं नावच घेत नाही. काल दिवसभर पावसाने अक्षरश: मुंबईला झोडपून काढल्यानंतरही, मध्यरात्रीपासून मुंबईत धो धो पाऊस सुरुच आहे. दक्षिण मुंबईसह अंधेरी, मालाड, बोरिवली, घाटकोपर भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे.

पवई भागातही जोरदार पाऊस पडत आहे
मुंबईत होणाऱ्या पावसाचा लोकल सेवेवर परिणाम होत आहे. कारण अनेक स्टेशनमध्ये ट्रॅकवर पाणी आलं आहे. नालासोपारा रेल्वेस्थानाकात ट्रॅकवर पाणी भरले आहे. त्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झालीयं.
लालबाग, घोडपदेव, माझगाव परिसरात जोरदार पाऊस
बोरिवलीतील अशोकनगर भागात 3 घरं जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली.
वांद्रे सी लिंकवर वाऱ्यासह जोरदार पाऊस
मुसळधार पावासाचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -