मुंबईच्या गर्भात मेट्रो 3 चं भव्यदिव्य बांधकाम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकप परेड, नरिमन पॉईंट, चर्चगेट, सीएसएमटी, गिरगाव, वरळी, दादर, माहिम, कलिना विद्यापीठ, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई विमानतळ, अंधेरी एमआयडीसी, आणि सीप्झ असा मुंबई मेट्रो 3 चा मार्ग आहे.
दरम्यान मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी लांबणीवर पडली आहे. डिसेंबर 2020 ऐवजी आता जून 2021 मध्ये मेट्रो 3 काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे साहजिक खर्चही वाढणार आहे. दरदिवशी सव्वाचार कोटी या हिशोबाने मेट्रो 3 च्या खर्चात तब्बल 765 कोटींनी वाढ होणार आहे.
या पॅकेज-4 अंतर्गत कृष्णा 1 आणि 2 या टीबीएम्सद्वारे दादर मेट्रो स्थानकापर्यंत 2.5 किमी भुयारीकरण केलं जाणार आहे.
मेट्रो 3 च्या मार्गातील सिद्धिविनायक स्टेशन मागील 2 ते 3 महिन्यात आकार घेत आहे. उत्खनन, बेस स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब, इंटरमिडिएट स्लॅब, साईड वॉल्स, सगळं या फोटोंमध्ये दिसत आहे. अथक परिश्रम करणाऱ्या एमएमआरसीच्या पॅकेज-4 टीमला सलाम, असं अश्विनी भिडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मेट्रो 3 कामाचे काही फोटो नुकतेच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मुंबई मेट्रो 3 प्रकल्प आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -