परळमधील क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर मोठी आग
मुंबईतील परळमध्ये असलेल्या क्रिस्टल टॉवरमध्ये मोठी आग लागली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया रहिवासी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली असून टॉवरमध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रहिवासी इमारत असल्याने काही जण अडकले असून त्यांना क्रेनच्या सहाय्याने वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत 10 ते 15 जणांना वाचवलं आहे. काहींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आणि सहा पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.
परेल पूर्वमधील हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवरमध्ये आज सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली.
तसंच तीन अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -