मुंबई इंडियन्स टी-20 इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा एकमेव संघ

ईडन गार्डन्सवरच्या सामन्यात मुंबईनं कोलकात्याला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याला 20 षटकांत आठ बाद 168 धावांत रोखलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई यंदाच्या आयपीएल मोसमात अगोदरपासूनच पहिल्या स्थानावर कायम आहे. कोलकात्यावर मिळवलेल्या विजयासोबतच हे स्थान निर्विवादपणे मुंबईने कायम राखलं. 14 सामन्यात 10 विजयांसह मुंबईच्या खात्यात सर्वाधिक 20 गुण आहेत.

मुंबई इंडियन्सने ईडन गार्डन्सवरच्या सामन्यात यजमान कोलकात्याचा नऊ धावांनी पराभव करून आयपीएलच्या साखळीत ‘नंबर वन‘चा निर्विवाद मान मिळवला. (Photo : IPL (BCCI)
मुंबईकडून टीम साऊदी, विनयकुमार आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल जॉन्सन आणि कर्ण शर्मानं एकेक विकेट काढून त्यांना छान साथ दिली. त्याआधी, या सामन्यात सौरभ तिवारी आणि अंबाती रायुडूच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं 20 षटकांत पाच बाद 173 धावांची मजल मारली होती.
कोलकात्यावर मिळवलेल्या विजयासोबत मुंबई इंडियन्स टी-20 इतिहासात सर्वाधिक 100 सामने जिंकणारा एकमेव संघ ठरला आहे.
या विजयासोबतच मुंबई इंडियन्सने आणखी एक विक्रम नावावर केला, जो टी-20 मध्ये अजून कोणत्याही संघाला करता आलेला नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -