मनसे कार्यकर्त्यांची उत्तर भारतीय फळविक्रेत्याला बेदम मारहाण!
मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा एकदा मराठी कार्ड बाहेर काढलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघाटकोपरमध्ये एका उत्तर भारतीय फळ विक्रेत्याला मनसेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे.
अमृतनगरमध्ये काल संध्याकाळी 4 ते 5 च्या दरम्यान हा प्रकार घडला. मारहाणीनंतर त्याच्या हातगाडीवरची फळंही रस्त्यावर फेकून दिली.
दुसरं कारण म्हणजे संबंधित व्यक्तीने कुण्या एका मराठी व्यक्तीला आडकाठी केल्यानं ही मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे.
दुसरं कारण म्हणजे संबंधित व्यक्तीने कुण्या एका मराठी व्यक्तीला आडकाठी केल्यानं ही मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे.
ही मारहाण नाही तर हे आंदोलन आहे. उत्तर भारतीयांच्या दादागिरीला आम्ही प्रत्युत्तर दिलं. शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यास आडकाठी करणाऱ्या परप्रांतियांना असंच उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी दिली.
कोणीही कायदा हातात घेईल, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिला. मनसे शेतकऱ्यांच्या नावावर उत्तर भारतीयांना मारहाण करणार असेल, तर त्यांनी आधी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं. मनसेने शेतकऱ्यांसाठी आठवडी बाजार भरवावा, त्याबाबतचा प्रस्ताव घेऊन यावा, मी स्वत: त्यासाठी प्रयत्न करेन, असंही शेलार म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -