मनसेकडून मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड
दरम्यान ह्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी, तोडफोड किंवा मारहाण करुन नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान हल्लेखोरांनी कार्यालयाची तोडफोड केली असली, तरी कोणत्याही कर्मचाऱ्याला मारहाण झालेली नाही.
हे हल्लेखोर कोण, कुठून आले याचा तपास सुरु होता. मात्र संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन मनसेने हल्ला केल्याचं सांगितल्यामुळे हल्लोखोर कोण हे आता स्पष्ट झालं आहे.
आज सकाळीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या काँग्रेस कार्यालयाची नासधूस करण्यात आली. आझाद मैदानाजवळ काँग्रेसचं कार्यालय आहे. या कार्यालयात घुसून मनसेने काँग्रेस कार्यालयाच्या काचा फोडल्या.
आज सकाळी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. मात्र हा हल्ला कोणी केला, याबाबत चर्चा सुरु असताना, स्वत: संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन, त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.
घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
मुंबई काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली आहे. काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं, अशा आशयाचं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -