किचन वेस्टमधून बेस्ट खत, ओला कचरा विघटन प्रक्रिया यंत्र
एबीपी माझा वेब टीम | 26 Feb 2018 07:56 PM (IST)
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबई महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार दहीसरमधील रिव्हर पार्क संकुलात ओला कचरा विघटन प्रक्रिया स्वयंचलित यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे.
2
विशेष म्हणजे या यंत्रासाठी मेन्टेनन्सचा कोणताही खर्च येत नाही. त्याचप्रमाणे घाणेरडा वास किंवा आवाजही होत नाही.
3
4
फळांची सालं, भाज्या, भाज्यांची टरफलं, भाजीची करी, रोटी, चपाती, ब्रेड, अंड्याचे साल, चिकनची हाडं, मासे, किचनमधील उर्वरित कचरा, बागेतील कचरा अशा कुठल्याही प्रकारचा जैविक कचरा या यंत्रात विघटित होतो.
5
इकोमॅट कंपनीच्या ओला कचरा विघटन प्रक्रिया यंत्रात 50 किलोपर्यंत ओला कचरा टाकता येतो. त्यातून सात किलो कम्पोस्ट खत तयार होतं.